मुलभुत अधिकार :-
समानतेचा अधिकार :-
- कायद्यापुढे समानता
- धर्म , वंश , जात , लिंग , जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करण्यास मनाई
- स्त्रिया व बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंद होणार नाही .
- सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी .
- अस्पृश्यता नष्ट करणे
स्वातंत्र्याचा अधिकार :-
- भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा
- शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा
- अधिसंघ वा संघ बनविण्याचा .
- भारताच्या राज्याक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा .
- भारताच्या राज्याक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा .
- कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय ,उदीम किंवा धंदा चालविण्याचा .
- अपराधांबद्दलच्या दोष सिद्धी बाबत संरक्षण
- जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे रक्षण .
- विविक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण
शोषणाविरुद्धचा अधिकार :-
- माणसांना अपव्यवहार आणि वेठ यांना मनाई .
- कारखाने इ. मध्ये वा धोक्याच्या कामावर चौदा वर्षे वयाखालील बालकांना कामावर ठेवण्यास मनाई . धर्मस्वातंत्र्याचा अधिकार :-
- सद्सदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रतिज्ञापन आचरण व प्रसार
- धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य .
- एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य .
- विविक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य .
सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार :-
- अल्पसंख्यांक समाजाच्या हितसंबंधांचे संरक्षण
- अल्पसंख्यांक समाजांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार .
नागरिकांची मुलभुत कर्तव्ये :-
- संविधानाचे पालन करणे आणि तत्वाप्रणीत आदर्श व संस्था , राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे .
- ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे .
- भारताची सार्वभौमता , एकता व एकात्मता उन्नत राखणे व त्यांचे संरक्षण करणे
- आवाहन केले जाइल तेव्हा देशाचे संरक्षण करणे व राष्ट्रीय सेवा बजावने
- धार्मिक , भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाउन अखिल भारतीय जनतेमध्ये एकोपा व भ्रातृभाव वाढीला लावणे ;
- स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे .
- आपल्या संमिश्र संकृतीच्या वारश्याचे मोल जाणून तो जतन करणे .
- आराण्ये , सरोवरे, वन्य जीवसृष्टी यासुद्धा नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबाबत दयाबुद्धी बाळगणे .
- विज्ञान निष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे .
- सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे .
- राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाइल आश्याप्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे .
No comments:
Post a Comment