आई-वडिलांशी कसे वागावे ?

आई-वडिलांशी कसे वागावे ?

आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्ती यांना वाकून नमस्कार करावा

        आई-वडील, तसेच घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सर्व व्यक्तींना वाकून, म्हणजे त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करावा.
        ‘मातृदेवो भव । पितृदेवो भव ।’ म्हणजे ‘माता-पिता हे देवासमान आहेत’, अशी आपल्या महान हिंदु संस्कृतीची शिकवण आहे.

आई-वडिलांचे महत्त्व जाणणार्‍या आणि
त्यांची सेवा करणार्‍या काही थोर विभूती

श्रावणबाळ : याने आपल्या अंध आई-वडिलांची सेवा न थकता सतत केली. वृद्ध आई-वडिलांनी काशीयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर याने लगेच ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. श्रावणबाळाने त्यांना कावडीत (काठीला तराजूसारख्या दोन टोपल्या लावून त्यात) बसवले आणि ती कावड खांद्यावर घेऊन तो काशीयात्रेला पायी जायला निघाला.
प्रभु श्रीरामचंद्र : ‘अयोध्येचे राज्य धाकटा बंधू भरत याला देऊन रामाने १४ वर्षे वनवासाला जावे’, या माता कैकेयीच्या आज्ञेचे रामाने मनःपूर्वक पालन केले आणि वडिलांचेही वचन राखले. 
भक्त पुंडलीक : याने आई-वडिलांची केलेली सेवा म्हणजे तपश्चर्याच होती. या तपश्चर्येमुळे श्री विठ्ठलही प्रसन्न होऊन त्याला भेटण्यासाठी आला. त्या वेळी आई-वडिलांच्या सेवेत थोडाही खंड पडावयास नको; म्हणून पुंडलिकाने जवळची एक वीट भिरकावून श्री विठ्ठलाला तिच्यावर उभे रहाण्याची विनंती केली.
छत्रपती शिवाजी महाराज : जिजामातेची भेट होताच शिवराय प्रथम तिला नमस्कार करायचे. महाराज जिजामातेचे सर्व ऐकायचे आणि तशी कृतीही करायचे. युद्धावर जातांनाही ते तिला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेऊनच जायचे.
आई-वडिलांची सेवा मनापासून करण्याचे फळ
        ‘आई-वडील आणि गुरु यांची सेवा करणे, ही सर्वांत उत्तम तपश्चर्या आहे’, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. 

तुष्टायां मातरि शिवे तुष्टे पितरि पार्वति ।
तव प्रीतिर्भवेद्देवि परबह्म प्रसीदति ।।

               महानिर्वाणतन्त्र, उल्लास ८, श्लोक २६
अर्थ : भगवान शंकर म्हणतात, ‘‘हे पार्वती, आई-वडिलांना संतुष्ट करणार्‍या जिवावर तुझी कृपा होते. अशा जिवावर परब्रह्मही प्रसन्न होते.’’
 आई-वडिलांना कधीच दुखवू नये
        आई-वडील मुलांसाठी पुष्कळ कष्ट सोसतात. मुलांचे बालपण चांगले जावे, त्यांना चांगले शिक्षण मिळावे यांसाठी ते प्रयत्न करतात; परंतु काही मुले आई-वडिलांना उलट बोलतात. त्यामुळे आई-वडिलांचे मन दुखावले जाते. मुलांच्या उलट बोलण्यामुळे आई-वडील दुखावले गेले, तर ते देवालाच दुखावल्यासारखे होते. मुलांनो, हे टाळण्यासाठी आई-वडिलांशी प्रेमाने वागावे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञ रहावे.
 आई-वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐकावे
        आई मुलांच्या आवडी-निवडीनुसार खाद्यपदार्थ बनवते, तसेच मुलांना काय हवे-नको ते लक्षपूर्वक बघते. आजारपणात त्यांची रात्रंदिवस प्रसंगी जागरण करूनही काळजी घेते. हे सर्व करत असतांना ती स्वतःकडे मुळीच लक्ष देत नाही. तिच्या डोक्यात सतत मुलांचाच विचार असतो. वडीलही मुलांच्या सर्व आवश्यकता पुरवण्यासाठी आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी कष्ट करून पैसे मिळवतात. जे लागेल ते मुलांना आणून देतात. असे असतांना मुलांनी ‘आपण आई-वडिलांचे मनापासून ऐकतो का’, याचा विचार करायला हवा.
        मुलांनो, खरेतर आई-वडिलांची कितीही सेवा केली, तरी त्यांचे ऋण फिटू शकणार नाही. आई-वडिलांच्या ऋणातून थोडेतरी मुक्त होण्यासाठी त्यांनी सांगितलेले मनापासून ऐकावे, तसेच त्यांच्याशी नेहमीच आदराने बोलावे.
 आई-वडिलांवरील प्रेम कृतीतूनही व्यक्त करावे
        मुलांचे आई-वडिलांवर प्रेम असतेच; पण ते प्रेम कृतीतूनही व्यक्त व्हायला हवे. मुलांचे प्रेम कृतीतून व्यक्त झाल्यावर आई-वडिलांनाही आनंद होतो. उदाहरण म्हणून अशा काही कृती पुढे देत आहोत. 
१)आई-वडील बाहेरून आल्यावर त्यांना चटकन पाणी आणून द्यावे : 
मुलांनो, आई-वडील बाहेरून घरी आले की, तुमच्यापैकी किती जण त्यांनी न मागता पाणी आणून देतात ? पाणी मागितल्यावरसुद्धा किती जण आईला ‘काय ग ? घे ना तुझे तू’, असे उलट बोलतात ? मुलांनो, असे बोलणे अयोग्य आहे. आई-वडील बाहेरून दमून आलेले असतात. अशा वेळी तुम्ही लगेच त्यांना पाणी आणून दिले, म्हणजे त्यांनाही चांगले वाटते.
२)आई-वडिलांना त्यांच्या कामांत साहाय्य करावे : 
आईला गिरणीवरून दळण, पेठेतून (बाजारातून) भाजी इत्यादी आणून द्यावे. त्यासाठी तिच्याकडे चॉकलेट आदी खाऊ मागू नये.
आई-वडिलांना त्रास न देता स्वतःची कामे स्वतः करावीत !
१)आई निजलेली असतांना तिला न उठवता स्वतःचे जेवण स्वतः वाढून घेणारी कु. सायली :
 ‘कु. सायली आठ वर्षांची असतांना तिच्या शाळेतून येण्याच्या वेळेला मला बर्‍याचदा झोप लागलेली असायची. तेव्हा ती मला न उठवता स्वतःच जेवण वाढून घ्यायची.’ - सौ. सरला ठाकरे  (कु. सायलीची आई), ता. चंदगड जि. कोल्हापूर  (वर्ष २०१५)
२) घरातील अन्य कामे करावीत :
१. जेवणापूर्वी सर्वांची ताटे-वाट्या, पाट-पाणी इत्यादी घ्यावे. जेवण झाल्यावर सर्व आवरून ठेवावे.
२. रात्री सर्वांची अंथरुणे घालून ठेवावीत.
३. आई-वडिलांचे पाय चेपावेत.

No comments:

Post a Comment

गणित

गणित

  1. खालीलपैकी कोणती कोनाची जोडी आहे?

  2. कोटीकोन
    प्रविशाल कोन
    सहअवसानी कोन
    सरळ कोन

  3. जय व देविका यांच्या आजच्या वयातील फरक ४ वर्षाचा आहे तर ५ वर्षानंतर वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक




  4. १४

  5. २५ व x या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा मसावी किती ?

  6. २५x
    २५
    x
    1

  7. ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ?

  8. चौरस
    समभूज चौकोन
    चक्रीय चौकोन
    आयत

  9. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या संपातबिंदूस काय म्हणतात?

  10. गुरुत्व मध्य
    परिकेंद्र
    आंतरमध्य
    शिरोबिंदू

  11. X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

  12. १६
    ३६
    ४८
    ३२

  13. 150 चा शेकडा 60 काढून येणार्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

  14. ३०
    ९६
    ५४
    ९०

  15. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

  16. ३२
    ३०
    ३४
    २८

  17. दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?

  18. ८४
    ४८
    ३२
    १६

  19. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

  20. 252 रु.
    336 रु.
    168 रु.
    420 रु.

धन्यवाद