बुद्धिबळ परिचय

बुद्धिबळ
बौद्धिक कौशल्यावर आधारलेला एक बैठा खेळ. चौसष्ट घरे (चौरस) असलेल्या पटावर प्रत्येकी सोळा सोंटया मांडून दोन खेळाडू तो खेळतात. बहुतेक खेळात यश मिळविण्यामध्ये कौशल्याबरोबरच योगायोगाचाही भाग असतो. मात्र बुद्धिबळाच्या खेळात योगायोग मुळीच नसतो, तर केवळ बुद्धिचातुर्याच्या आणि तंत्रकौशल्याच्या बळावरच खेळाडूला विजय हस्तगत करता येतो.
चतुरंग : बुद्धिबळ हा मुळ भारतीय खेळ असून, प्राचिन काळी तो 'चतुरंग' या नावाने ओळखला जात असे. हा खेळ प्राचिन काळी भारतातच सुरू झाला, हे आता निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. 'रॉयल एशियाटिक सोसायटी' चे अध्यक्ष सर विल्यम जोन्स, ऑक्सफर्डचे टॉमस हाईड तसेच मरी, स्टॉन्टन इ. अनेक संशोधकांनी बुद्धिबळाचा उगम भारतातच झाला असल्याचे दाखवून दिले आहे. सिंहासन बत्तीसीमध्ये व काही पुराणांतही या खेळाचे उल्लेख सापडतात. भारतातून हा खेळ इराण, अरबस्तानमार्गे यूरोपमध्ये तसेच काश्मिरमार्गे चिनमध्ये जाउन तेथून कोरीया, जपान इ. ठिकणी प्रसृत झाला असावा. रशियात तो तिबेट, पर्शियामार्गे गेला असण्याचा संभव आहे. पर्शियन 'छतरंग', अरबी 'शतरंज,' मलायी 'छतोर', मंगोल 'शतर', चिनी 'सिंयांंकी' इ. मुळ संस्कृत चतूरंगाचीच विविध रूपे होत.
बुद्धिबळ
(इंग्लिशमध्ये चेस व हिंदीमध्ये शतरंज) हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. बुद्धिबळाची सुरुवात भारतातून झाली. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हे पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखले जाते. बुद्धिबळ सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध खेळांपैकी एक आहे. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये, पत्राने, आंतरजालावर व विविध स्पर्धांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो. बुद्धिबळ एका चौरस पटावर खेळला जातो. या ८ ८ च्या पटावर ६४ घरे असतात व ती आलटून पालटून क्रमाने काळयापांढर्‍या रंगाची असतात. पहिला खेळाडू पांढर्‍या तर दुसरा काळया सोंगट्यांनी खेळतो. या सोंगट्यांना मोहरे म्हणतात. प्रत्येक खेळाडूचे एका रंगाचे सोळा मोहरे असतात. एक राजा, एक वजीर(राणी), दोन हत्ती(रुक), दोन घोडे(सरदार, नाइट), दोन उंट(बिशप) आणि आठ प्यादी(पॉन). प्रतिस्पर्धयाच्या राजाला शह, म्हणजे मृत्यूचा धाक देऊन मात करणे(हरवणे) हा खेळाचा उद्देश असतो. राजाला शह मिळाल्यानंतर कुठलीही खेळी करून जेव्हा त्याला शहातून बाहेर पडता येत नाही त्यावेळी राजावर मात झाली असे मानले जाते. विचारवंतांनी बराच अभ्यास करून मात करण्यासाठी विविध क्रमांच्या चालींच्या खेळी रचल्या आहेत. स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. इ.स. १८८६ साली विल्हेल्म स्टेइनिट्झ हा पहिला अधिकृत बुद्धिबळ विश्वविजेता झाला. बुद्धिबळाच्या सांघिक स्पर्धा "बुद्धिबळ ऑलिंपियाड" दर दोन वर्षातून एकदा भरवल्या जातात. दोन आंतरराष्ट्रीय संघटना फेडेरेशन इंटरनॅशनल देस इचेक्स (फिडे) आणि इंटरनॅशनल करस्पॉंडन्स चेस फेडेरेशन, जगातील महत्त्वाच्या स्पर्धा भरवतात. बुद्धिबळ खेळणार्‍या संगणकाच्या निर्मितीसाठी संगणकतज्ज्ञम्प्;ाम्प्;ा पहिल्यापासून प्रयत्नशील होते. त्यामुळेच अलीकडील बुद्धिबळावर संगणकाचा प्रभाव पडलेला दिसतो. इ.स. १९९७ मध्ये गॅरी कास्पारोव्ह, त्यावेळचा जगज्जेता आणि आय. बी. एम कंपनीचा डीप ब्ल्यू संगणक यांच्यातील सामन्यातून सर्वात बुद्धिमान, कुशल माणसाला बुद्धिबळात हरवणारी संगणक प्रणाली तयार करता येते हे सिद्ध झाले.
नियम :
बुद्धिबळ एका ८ स्तंभ आणि ८ ओळींच्या चौरसाकृती पटावर खेळला जातो. स्तंभांना इंग्लिश ा पासून ह पर्यंत तर पंक्तींना १ ते ८ अशी नावे असतात. ६४ चौरसांचे रंग काळे पांढरे असतात. सोंगट्या एकसारख्या काळया आणि पांढर्‍या अशा दोन संचात विभागलेल्या असतात. प्रत्येक संचात १६ मोहरे असतात. १ राजा, १ वझीर, २ उंट, २ घोडे, २ हत्ती आणि ८ प्यादी. खेळाडू काळा किंवा पांढरा संच नाणेफेक करून निवडतात किंवा स्पर्धेच्या नियमानुसार कुणी कुठला संच घेऊन खेळायचे ते ठरते. प्रत्येक खेळाडूच्या उजव्या हाताच्या कोपर्‍यात पांढरा चौरस येईल अशा पद्धतीने पट मांडला जातो. काळया संचातील वझीर काळया घरात तर पांढरा वझीर पांढर्‍या घरात असतो. पांढरा पहिली चाल करतो. नंतर प्रत्येक खेळाडू स्वत:चे मोहरे वापरून एकानंतर एक चाली करतात. मोहरे रिकाम्या घरात किंवा प्रतिस्पर्धयाच्या मोहर्‍याला मारून त्याच्या घरात ठेवता येतात. मेलेला मोहरा डावाबाहेर काढला जातो. जर राजाला विरोधी मोहरा एका खेळीत मारू शकत असेल तर राजाला शह मिळाला असे म्हटले जाते. खेळाडू स्वत:च्या राजास शह बसेल अशी कोणतीही चाल खेळू शकत नाही तसेच स्वत:च्या राजास शह बसेल अशी कोणतीही चाल प्रतिस्पर्धी खेळाडूला शक्यतो करू देत नाही. इतके करून जर एखाद्या खेळाडूच्या राजाला शह मिळालाच तर त्याला राजाला एका खेळीत शहातून बाहेर काढणारी चाल करावी लागते. जर अशी चाल खेळता येत नसेल तर त्या खेळाडूची हार झाली असे मानले जाते. प्रत्येक खेळाडू दुसर्‍याचा राजावर मात करून त्याला हरवण्यासाठी चिकाटीने खेळतो. जो पहिल्यांदा यशस्वी होतो तो जिकला.
बुद्धिबळाचा प्रत्येक मोहरा विशिष्ट पद्धतीने चाली करतो.
राजा उभ्या, आडव्या आणि तिरप्या दिशेने एक घर जाऊ शकतो. प्रत्येक डावात राजा फक्त एकदाच एक विशेष चाल "किल्लेकोटज्ञ्थ्ुेत्; करू शकतो. किल्लेकोटामध्ये राजा दोन घरे हत्तीच्या दिशेने जातो आणि हत्ती राजाला लागून राजाच्या पलीकडे सरकतो. जर
राजा किंवा किल्लेकोटात सहभागी असलेला हत्ती यापूर्वी या डावात कधीच हाललेला नसेल,
राजा आणि हत्तीमध्ये कुठलाही मोहरा नसेल,
राजाला शहाच्या धाकाखाली नसेल, किल्लेकोट करताना राजा ज्या घरांतून सरकतो त्यावर विरोधी मोहर्‍यांचा रोख नसेल आणि किल्लेकोट झाल्यानंतर राजा शहाच्या धाकाखाली येणार नसेल, तरच किल्लेकोट करता येतो.
किल्लेकोट झाल्यावर राजाला शह देणे अवघड होते.
हत्ती आडव्या किंवा उभ्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. उंट तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. तिरपी घरे एकाच रंगाची असल्याने मूळ पांढर्‍या घरातला उंट पांढर्‍या व दुसरा नेहमी काळया घरातूनच हिंडतो. प्रत्येक खेळाडूच्या दोन उंटांपैकी एक पांढर्‍या तर दुसरा काळया घरात असतो. वझीर आडव्या, उभ्या किंवा तिरप्या दिशेने कितीही रिकामी घरे जाऊ शकतो. घोडा रिकाम्या किंवा भरलेल्या घरांवरून उड्या मारू शकतो. तो दोन घरे आडव्या दिशेने आणि एक घर उभ्या दिशेने किंवा दोन घरे उभ्या दिशेने आणि एक घर आडव्या दिशेने जातो. याला अडीच घरांची चाल असेही म्हटले जाते. प्रत्येक चालीनंतर घोड्याच्या घराचा रंग बदलतो. प्यादयांच्या चाली सर्वात गुंतागुंतीच्या आहेत:
घोडा सोडून कोणताही मोहरा दुसर्‍याला ओलांडून पलीकडे उडी मारू शकत नाही. स्वत:च्या मोहर्‍यांना मारता येत नाही. फक्त विरोधी मोहर्‍यांनाच मारता येते. ज्यावेळी एखादा मोहरा मारला जातो त्यावेळी मारेकरी मोहरा त्याची जागा घेतो. ( याला "एन पासंज्ञ्थ्ुेत्; चा अपवाद आहे) मेलेला मोहरा डावातून बाद होतो. प्याद्याला बढती मिळाल्यानंतर तो नवीन मोहरा म्हणून वापरला जातो. पण बढती मिळाल्यावर मेलेलाच मोहरा घ्यावा अशी अट नाही. राजा मारला जाऊ शकत नाही त्याला अंतिम शह देता येतो. राजाला शहातून बाहेर काढता येत नसल्यास मात झाली असे समजून खेळाडू हरतो. बुद्धिबळाचा डाव 'शह देऊन मात करणे या शिवाय अजूनही काही प्रकारे संपू शकतो पटावर वाईट परिस्थिती असल्यास खेळाडू राजीनामा देतो ( हार मान्य करतो. किंवा डाव अनिर्णित राहू शकतो. अर्धवट मात, तीनदा पुनरावृत्ती, ५० चालींचा नियम किंवा शह देऊन मात न होण्याची शक्यता यापैकी एखादी गोष्ट असेल तर खेळ अनिर्णित ठरवला जातो.
सुरुवात :
जरी अनेक देश बुद्धिबळाच्या शोधाचा दावा करत असले तरी बुद्धिबळ ह्या खेळाची सुरुवात प्रथम भारतात झाली असे सध्यातरी मानले जाते. बुद्धिबळासाठी विविध भाषांत वापरले जाणारे शब्द भारतीय चतुरंग या शब्दापासून तयार झाले आहेत यावरून हे स्पष्ट होते. चतुरंग म्हणजे "सैन्याची चार अंगज्ञ्थ्ुेत्; पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ. तसेच प्राचीन काळात फक्त भारतातच सैन्यांमध्ये घोडे, उंट आणि हत्ती हे तीनही प्राणी वापरले जात होते. साहित्यामध्ये बुद्धिबळाचा पहिला संदर्भ इ.स. पूर्व ५०० मध्ये भारतात दिघ निकय मध्ये ब्रह्मजल सुत्त या ग्रंथात आढळतो. पर्शियामधील पहिला संदर्भ इ.स. ६०० च्या दरम्यान आढळतो; येथे त्याला शतरंज असे म्हटले आहे. सातव्या शतकात मोहर्‍यांचे वर्णन केलेले आढळते. इ.स. ८०० पर्यंत खेळ चीनमध्ये शिआंकी नावाने पोचला होता. मुस्लीम जगाने शतरंज पर्शियाच्या विजयानंतर उचलला. मोहोर्‍यांची पर्शियन नावे तशीच राहिली. स्पेनमध्ये त्याला ाज्एदरएठ "अजेद्रेज्ञ्थ्ुेत्;, पोर्तुगीजमध्ये ादरएठ आणि ग्रीकमध्ये "ठात्रकिेिन्" तर बाकीच्या युरोपमध्ये पर्शिय"; "शा";" शब्दाच्या विविध रूपांनी ओळखले जाऊ लागले. खेळ पश्चिम युरोप आणि रशियामध्ये तीन वेगवेगळया मार्गांनी पोचला. पहिल्यांदा नवव्या शतकात सुरुवात झाली. १००० पर्यंत सर्व युरोपभर पसरला. इबेरियन पठारावर मुर यांनी दहाव्या शतकात खेळाची ओळख करून दिली. आणि एका विचारानुसार बुद्धिबळ, चीनमधील शिआंकी पासून सुरू झाले असावे.
आधुनिक खेळाची सुरुवात (१४५० - १८५०)
शतरंजमधील मोहर्‍यांच्या चाली मर्यादित होत्या. सध्याचा उंट (ज्याला पूर्वी हत्ती म्हटले जायचे) त्याकाळी फक्त तिरपी दोन घरे उडी मारू शकत असे. मंत्री (म्हणजे सध्याचा वझीर) फक्त तिरपे एक घर जाऊ शकत असे; प्यादी सुरुवातीला दोन घरे जाऊ शकत नव्हती, आणि किल्लेकोटाची संकल्पनाच नव्हती. प्याद्यांना बढती मिळून फक्त मंत्री होता येत असे.
इ.स. १२०० च्या दरम्यान दक्षिण युरोपमध्ये नियम बदलण्यास सुरुवात झाली आणि १४७५ च्या आसपास काही महत्त्वाचे बदल केले गेले. चालींसाठीचे आधुनिक नियम इटलीमध्ये तयार झाले. (काही लोक हे स्पेनमध्ये झाले असे मानतात.) प्याद्यांना पहिली २ घरांची चाल मिळाली आणि त्यातूनच एन पासंट सुरू झाले. उंट आणि वझीर यांना आज वापरल्या जाणार्‍या चाली मिळाल्या. त्यामुळेच वझीर सर्वात महत्त्वाचा मोहरा ठरला. या बुद्धिबळाला "वझिराचे(राणीचे) बुद्धिबळज्ञ्थ्ुेत्; संबोधले जाऊ लागले.हे नियम लगेचच पश्चिम युरोपात पसरले. 'अर्धवट मात'बद्दलचे नियम मात्र १९ व्या शतकात निश्चित झाले.
याच काळात बुद्धिबळावर ग्रंथ लिहिले जाऊ लागले. सर्वात जुने अजूनही टिकलेले छापील पुस्तक ृएप्एत्च्/िन् दए अम्ेरएस् य् अरत्ए दए अज्एदरएठ (इंग्लिशमध्ये ृएप्एत्त्ेिन् ेफ ळेव्ए ान्द त्हए अरत् ेफ ऋलय्न्ग् िछहएस्स्) स्पेनच्या लुइस रामिरेझ दे लुसेना याने सालामांका येथे प्रसिद्ध केले. लुसेना आणि त्यानंतरच्या १६ व्या आणि १७ व्या शतकातील तज्ञांम्प्;ाांनी, उदाहरणार्थ, पोर्तुगालच्या पेद्रो दामिआनो, इटलीच्या जिओवान्नी लिओनार्दो डी बोना, गिउलिओ सीझर पोलेरिओ आणि जिओअक्िसनो ग्रेको किंवा स्पेनचे धर्मगुरू रूय लोपेझ दे सेगुरा यांनी डावाची सुरुवातीला करावयाच्या चालींसंबंधीची मूलभूत तत्त्वे विकसित केली. त्यातूनच इटालियन गेम, किंग्ज गॅंबिट आणि रूय लोपेझ सारख्या डावांची सुरुवात झाली. १८ व्या शतकात युरोपातील बुद्धिबळाचे केंद्र दक्षिण युरोपातील फ्रान्स बनले. दोन महत्त्वाचे फ्रेंच तज्ञांम्प्;ा, प्यांद्यांचे महत्त्व जाणणारे फ्रॅंकॉईर्सआंद्रे डॅनिकन फिलिडोर, व्यवसायाने संगीतकार, आणि लुइस चार्लस माहे दे ला बुर्दोनाईस यांनी ब्रिटिश तज्ञांम्प्;ा आलेक्झांडर मॅकडॉनेल याला १८३४ मध्ये विविध मालिकांमध्ये हरवले. त्यावेळी बुद्धिबळ युरोपातील मोठ्या शहरातील कॉफीघरांतून खेळले जात असे. उदाहरणार्थ: कॅफे दे ला रेजंस, पॅरीस आणि सिम्पसन्स दिवान, लंडन . १९ व्या शतकात विविध संघटना स्थापल्या गेल्या. बरेच क्लब्ज, पुस्तके आणि जर्नल्स प्रसिद्ध होऊ लागली. पत्रांद्वारे बुद्धिबळ सामनेही खेळले जाऊ लागले. उदा: लंडन चेस क्लब आणि एडिंबरो चेस क्लब यांमधील १८२४ मध्ये झालेला सामना.वर्तमानपत्रातून येणारी बुद्धिबळातील कोडीही लोकप्रिय होऊ लागली. बनार्ड हॉरविट्झ, जोसेफ किंग आणि सॅम्युएल लॉईड यांनी एकापेक्षा एक सरस कोडी रचली. १८४३ मध्ये जर्मनीच्या पॉल रुडॉल्फ वॉन बिल्गुएर आणि टासिलो हेडेब्रांड उंड डेर लासा. या तज्ञांम्प्;ाांनी लिहिलेल्या ह्ान्दब्ुच्ह दएस् श्च्हाच्हस्प्एिल्स् या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
स्पर्धात्मक खेळाची सुरुवात (१८५०-१९४५)
पहिली आधुनिक बुद्धिबळ स्पर्धा लंडनमध्ये इ.स. १८५१ ला घेण्यात आली. त्यात जर्मनीचा डॉल्फ अ‍ॅंडरसनविजयी झाला. यानंतर अ‍ॅंडरसनला आघाडीचा बुद्धिबळ तज्ञांम्प्;ा मानले जाऊ लागले.

No comments:

Post a Comment

गणित

गणित

  1. खालीलपैकी कोणती कोनाची जोडी आहे?

  2. कोटीकोन
    प्रविशाल कोन
    सहअवसानी कोन
    सरळ कोन

  3. जय व देविका यांच्या आजच्या वयातील फरक ४ वर्षाचा आहे तर ५ वर्षानंतर वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक




  4. १४

  5. २५ व x या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा मसावी किती ?

  6. २५x
    २५
    x
    1

  7. ज्या चौकोनाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात ?

  8. चौरस
    समभूज चौकोन
    चक्रीय चौकोन
    आयत

  9. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या संपातबिंदूस काय म्हणतात?

  10. गुरुत्व मध्य
    परिकेंद्र
    आंतरमध्य
    शिरोबिंदू

  11. X व Y समचलनात आहेत. जिव्हा समचलनात X=40 तेव्हा Y = 24. जर X =60 असेल. तर Y = किती ?

  12. १६
    ३६
    ४८
    ३२

  13. 150 चा शेकडा 60 काढून येणार्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

  14. ३०
    ९६
    ५४
    ९०

  15. चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

  16. ३२
    ३०
    ३४
    २८

  17. दोन संख्यांना ल.सा.वि. 192 व म.सा.वि. 16 आहे. त्यापैकी एक संख्या 64 असल्यास दुसरी संख्या कोणती?

  18. ८४
    ४८
    ३२
    १६

  19. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

  20. 252 रु.
    336 रु.
    168 रु.
    420 रु.

धन्यवाद